मुलाचे अपहरण करून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

11 year old boy abducted Assault Crime against both

अकोला : मुलाचे अपहरण करून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

अकोला : ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून जुने शहर पेालिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंतर मुलगा घरी आल्यानंतर त्याच्या आपबितीवरून ही कारवाई करण्यात आली.

शनिवार, ता. १९ मार्चला सायंकाळी मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यानंतर त्याला दुचाकीवर आलेल्या दोघांनी दुचाकीवर बसूवून नेले. त्याच्या तोंडावर कपडा टाकून त्याला गांधीरोडवर घेऊन गेले. तेथे त्याला मारहाण करून सोडून दिले. इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आई-वडिलांनी शोध घेतला मात्र तो सापडलाच नाही.

अखेर पोलिस ठाण्यात देण्यासाठी जात असताना मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत रात्री साडेनऊच्या सुमारास दिसून आला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने घराजवळच राहणारा आदित्य दुबे व त्याचा मित्राचे नाव सांगितले. त्यांनी तोंडाला व हाताला रूमाल बांधून गांधी रोडकडे नेले व मला शिवीगाळ करून थापडा-बुक्यांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले. मुलाच्या आईने तक्रारीत नमूद केले की, बुधवार, ता. १६ मार्चला आदित्य दुबे याने माझ्या मुलाला शिवीगाळ केली होती. मी त्यास कारण विचारले असता त्याने मला सुद्धा शिव्या दिल्या होत्या. त्याचा राग मनात धरून त्याने आपल्या मुलाचे अपहरण केले होते. त्यात मुलाला जखमाही झाल्याचे त्यांनी नमूद केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 11 Year Old Boy Abducted Assault Crime Against Both

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
go to top