Akola News : ‘MRI’साठी 2 हजार रुपये; दारिद्र्य रेषेखालील असो की ज्येष्ठ नागरीक; 5 लाखा पर्यंत उपचार मोफत

दारिद्र्य रेषेखालील असो की ज्येष्ठ नागरीक, सर्वांना एकच नियम; शासन म्हणते पाच लाखा पर्यंत उपचार मोफत
2 thousand rupees for MRI Whether below poverty line for senior citizens Free treatment up to 5 lakhs akola health centers
2 thousand rupees for MRI Whether below poverty line for senior citizens Free treatment up to 5 lakhs akola health centersSakal

माझोड : दारिद्र्य रेषेखालील असो की ज्येष्ठ नागरिक विशेष अतिविषशोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहे. एकीकडे शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहिराती झळकत आहेत तर दुसरीकडे विशेष अतिविषशोपचार रुग्णालयात साध्या एमआरआयचे दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याने मोफत उपचार सुरू तरी कुठे आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अकोल्यातीली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात ‘एमआरआय’ करणे म्हणजे एका दिव्य प्रक्रियतून जावे लागते. माझोड येथील ज्येष्ठ महिला नर्मदा रामकृष्ण खंडारे यांचा ‘एमआयआर’ काढण्यासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गेल्यानंतर कक्ष क्रमांक चार समोर वयोवृद्ध असले तरी रांगेत लागावे लागते.

वयोवृध्द व तरुण रुग्णांची वेगळी रांग नाही. एक ते दीड तासांनी नंबर लागल्यानंतर खाजगी डॉक्टरांची फाईल पाहून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी ‘एमआरआय’ लिहून दिला आणि अतिविषेशोपचार रुग्णालयात जाण्यास सांगितले.

सर्वोपचार रुग्णालयापासून हे रुग्णालय एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे स्वतःचे वाहन नसल्यास रुग्णांना स्पेशल ऑटो करून जावे लागते आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास पायी! तेथे गेल्यानंतर संबंधित परिचारिका यांनी एक फार्म दिला.

सदर फार्म पुन्हा सर्वोपचार रुग्णालयातून भरून आणावयास सांगितला. (वास्तविक पाहता तेथेच ती व्यवस्था असायला हवी.) पुन्हा सर्वोपचार रुग्णालयात आल्यानंतर शिकाऊ डॉक्टरांना त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे कक्ष क्रमांक १०४ मधून १०२ मध्ये पाठविण्यात आले. त्यांनी सुध्दा यावर विभाग प्रमुखांची सही पाहिजे म्हणून परत पाठविले.

2 thousand rupees for MRI Whether below poverty line for senior citizens Free treatment up to 5 lakhs akola health centers
Akola News : राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात अकोल्याच्या 3 बॉक्सरची निवड

आता विभाग प्रमुख कोण हे रुग्णांना माहिती नाही. शेवटी सदर फार्म डॉ. नैताम यांना दाखविले. नंतर डॉ. अष्टपुत्रे विभाग प्रमुख असल्याची माहिती मिळाली. डॉ. अष्टपुत्रे यांनी मात्र रस्त्यावरच सदर रुग्णाचा फार्म भरून देऊन या रुग्णाची मदत केली.

आता पुन्हा तो फार्म घेऊन अतिविषेशोपचार रुग्णालयात जावे लागले. तेथे गेल्यानंतर ‘एमआरआय’ची तारीख देऊन त्याचे दोन हजार रुपये सर्वोपचार रुग्णालयात जाऊन भरून येण्यास सांगण्यात आले.

2 thousand rupees for MRI Whether below poverty line for senior citizens Free treatment up to 5 lakhs akola health centers
Akola News : आरोग्य सेवांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सज्ज; १४ महिन्यांत १३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना सहाय्य

दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे व रुग्ण सुध्दा ज्येष्ठ महिला आहे, हे सांगितल्यानंतर, ‘तुम्ही काही पण असा दोन हजार रुपये भरावेच लागतात’, हे येथील परीचारिकेने आवर्जून सांगितले. हा सर्व प्रकार पाहल्यानंतर येथे एमआरआय करणे म्हणजे एका दिव्यातूनच जाणे असल्याचे जाणवले. रुग्णांचा त्रास टाळण्यासाठी एकाच ठिकाणी याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

अतिविषेशोपचार रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी नियमाप्रमाणे दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. यात स्वातंत्र्य सैनिकांना सूट आहे.

- डॉ.मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com