Water Storage : अकोला जिल्ह्यातील २९ धरणात २१ टक्केच जलसाठा शिल्लक!

मॉन्सूनचे आगमन लांबल्यास पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता
Katepurna dam water storage
Katepurna dam water storagesakal

अकोला - तीव्र उन्हाळ्याचे आगामी आठ दिवस बाकी असताना जिल्ह्याच्या लहान मोठ्या २९ धरणातील जलसाठा केवळ २१ टक्केच शिल्लक आहे. गत चार वर्षांतील जूनच्या प्रारंभीचा हा सर्वांत कमी साठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडे असलेल्या नोंदीतून समोर आले आहे. सध्याच ग्रामीण तसेच शहरीभागात पाणीटंचाईचे संकट ओढवलेले असून, मॉन्सूनचे आगमन लांबल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना अकोलेकरांना करावा लागू शकतो.

वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यास शहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जून महिन्याच्या प्रारंभीच अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या लहान-मोठ्या आणि मध्यम २९ धरणांत ७६.०९ दशलक्ष घनमीटर (२१.४६ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११ टक्के साठा कमी आहे. धरणातील जलसाठ्याचे घटते प्रमाण सध्या‎चिंतेचा विषय बनला आहे. आज धरणांमध्ये गतवर्षापेक्षा ३२ हजार ‎दशलक्ष घनफूट जलसाठा कमी आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील सर्वात‎मोठे धरण काटेपूर्णा आणि मध्यम धरण मोर्णा भरले नव्हते. या दोन‎धरणातून तसेच इतरही मध्यम आणि लहान धरणातून पाण्याची मागणी ‎वाढली. तसेच तापमानाचा पारा मे महिन्यात ४५ अंशापार गेल्याने‎ बाष्पीभवन वेगाने झाले. त्याचाही परिणाम जलाशयातील घटीवर झाल्याचे दिसून येते.

पाणीटंचाईची तीव्रता वाढली

महिनाभरापासून जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत आहे. दोन दोन आठवड्यानंतर नळाला पाणी सोडले जात असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे. पाणी साठवण्याचीही अडचण असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आमचे गाव खारपानपट्ट्यात येते. गावात १५ ते २० दिवसांच्या अंतराने नळ येत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासते. त्यामुळे पाणी साठवून ठेवावे लागते. साठवूण ठेवलेल्या पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा व्हावा ही प्रशासनाकडून अपेक्षा आहे.

- रवि पाटील, नागरिक, घुसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com