esakal | २६ रुग्णालयांना मिळाले ४५४ रेमडेसिव्हिर

बोलून बातमी शोधा

२६ रुग्णालयांना मिळाले ४५४ रेमडेसिव्हिर
२६ रुग्णालयांना मिळाले ४५४ रेमडेसिव्हिर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती सुरू होती. त्याला मंगळवारी काही प्रमाणात ब्रेक लागला. 26 hospitals received 454 remedies जिल्ह्यातील २६ रुग्णालयांना ४५४ रेमडेसिव्हिरचे वाटप करण्यात आली. त्यामुळे इंजेक्शनच्या काळाबाजारालाही आळा बसण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील २६ रुग्णालयांना ४५४ इंजेक्शन्सचे वाटप करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिला. त्यानुसार हॉटेल रिजेन्सी यांना २८, ओझोन हॉस्पिटल २४, सहारा हॉस्पिटल २४, बिहाडे हॉस्पिटल २४, इंदिरा हॉस्पिटल २३, आधार हॉस्पिटल चार, नवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल २७, देशमुख मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १५, आयकॉन हॉस्पिटल ४२, स्कायलार्क हॉस्पिटल सात, हार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १४, अवघाते हॉस्पिटल १०, देवरा हॉस्पिटल २४, यकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल २१, सूर्यचंद्रा हॉस्पिटल २४, अकोल ॲक्सीडेंट आठ, क्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल येथे पाच, युनिक हॉस्पिटल १४, ठाकरे हॉस्पिटल १४, के.एस. पाटील २२, वोरा क्रिटीकल हॉस्पिटल २०, इनफिनीटी हेल्थ केअर पाच, आधार हॉस्पिटल २६, बबन हॉस्पिटल पाच, उशाई हॉस्पिटल ११ व राजेंद्र सोनोने हॉस्पिटल येथील १३ असे एकूण ४५४ रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.

... तर होईल कारवाई

रुग्णालयांना रेमडिसिव्‍हिर प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीनेच फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेताकडे सादर करून औषधाचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतेही सबब, दिरंगाई, टाळाटाळा व कसूर होणार नाही यांची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेतांनी घ्यावी.

संपादन - विवेक मेतकर