esakal | सेवा सहकारी सोसायटीकडून ४१ कोटींचे पीक कर्ज वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा सहकारी सोसायटीकडून ४१ कोटींचे पीक कर्ज वाटप

सेवा सहकारी सोसायटीकडून ४१ कोटींचे पीक कर्ज वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


तेल्हारा ः तालुक्यात यावर्षी गावोगावोच्या सेवा सहकारी सोसायटीतर्फे पाच हजार २४५ शेतकरी सभासदांना ४० कोटी ९३ लाख ३९ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
तेल्हारा तालुक्यात ३५ सेवा सहकारी सोसायटी आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये पीक कर्ज वाटप केले जाते. यावर्षी शंभर टक्के शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज खाते निल केले आहे. (41 crore crop loan disbursement from Seva Sahakari Society)

हेही वाचा: युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

परिणामी ता. १४ जूनपर्यंत पाच हजार २४५ शेतकरी सभासदांना नव्याने पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यांना ४० कोटी ९३ लाख ३९ हजार रुपये पीक कर्ज वितरित केले आहे. यापैकी १७७ नवीन सभासदांना एक कोटी ३३ लाख ९९ हजार रुपये वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक अवारे यांनी दिली.

हेही वाचा: शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री

तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या ज्या सभासदांनी पीक कर्ज घेतले नाही, त्या सभासदांनी सेवा सहकारी सोसायटीशी संपर्क करून पीक कर्ज प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक रुपाली संदिप खारोडे यांनी केले आहे.

41 crore crop loan disbursement from Seva Sahakari Society

loading image