अकोला : कोविड बळींच्या वारसांचे ४५० अर्ज मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

अकोला : कोविड बळींच्या वारसांचे ४५० अर्ज मंजूर

अकोला : कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय अनुदान (मदत) मिळावे यासाठी पुरेसे कागदपत्र सादर न केल्याने गत आठवड्यात जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या ६०० जणांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. सदर अर्जातील त्रुटी व पुरेशे कागदपत्र संबंधितांच्या नातेवाईकांनी जोडावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आल्याने जिल्हास्तरावरून आतापर्यंत ४५० जणांचे अर्ज मंजुर करुन शासनाकडे ऑनलाईन सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोविड बळींच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

हेही वाचा: नागपूरात एक जानेवारीला शंभरावर बालकांचा जन्म

जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणात गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा सामना करत आहेत. संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. तसेच आजारावरही अनेकांचा प्रचंड खर्च झाला. त्यामुळे कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जिल्ह्यात अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे सदर अनुदानासाठी गत आठवड्यात जिल्ह्यातील ६०० जणांनी अर्ज केले होते. परंतु संबंधित अर्जांसाठी नातेवाईकांनी योग्य कागदपत्र न लावल्याने त्यांचे अर्ज मंजुर करण्यास विलंब होत होता. दरम्यान सदर संबंधी शासनाकडून पाठपुरावा करण्यात आल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून ४५० अर्ज मंजुर करून शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या संकटातही अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उमलले जीवन! एक हजारावर बालकांचा जन्म

सर्वाधिक बळी मनपा क्षेत्रात

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जिल्ह्यातील १ हजार ४३१ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण ७२३ रुग्ण अकोला महापालिका क्षेत्रातील आहेत. याव्यतिरिक्त तेल्हारा तालुक्यात ५९, पातूर ६६, मूर्तिजापूरमध्ये ११५, बार्शीटाकळी ८५, बाळापूर ११०, अकाेट १५३, अकाेला ग्रामीण क्षेत्रातील १२० रुग्ण आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akolacovid deaths
loading image
go to top