नागपूरात एक जानेवारीला शंभरावर बालकांचा जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरात एक जानेवारीला शंभरावर बालकांचा जन्म
नागपूरात एक जानेवारीला शंभरावर बालकांचा जन्म

नागपूरात एक जानेवारीला शंभरावर बालकांचा जन्म

नागपूर : नववर्षाच्या पर्वावर बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याचा आनंद झाला. बाराच्या ठोक्‍याला बाळाच्या(BABY) जन्माचा आनंदोत्सव साजरा करावा असे विचार मनात आले. जन्माची वेळ सांगता येत नाही. बाराचा ठोका चुकला खरा, परंतु नववर्षाच्या (NEW YEAR)पहिल्या दिवशी नवा पाहुणा घरी आला. मुलगी असो वा मुलगा...बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू, अशा भावना एक जानेवारीला जन्माला आलेल्या चिमुकल्यांच्या माता-पित्यांनी व्यक्त केल्या. उपराजधानीत एक जानेवारी २०२१ रोजी डागा, मेयो आणि मेडिकलसह खासगी रुग्णालयात पहिल्या बारा तासात शंभरावर बाळ जन्माला आली.(Hundreds babies born on January 1 in Nagpur)

हेही वाचा: नागपूरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी रांगा

यावरून २४ तासांमध्ये सुमारे पाऊणे दोनशेवर बाळ जन्माला आली असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. डागा रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता बाळ जन्मला आले. तर मेयोतही याच दरम्यान आले. मेडिकलमध्ये मात्र मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी बाळ जन्माला आले. मेडिकलमध्ये पहिल्या बारा तासात २३ प्रसूती झाल्या. यात १३ मुली आणि १० मुले जन्माला आली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या बारा तासात सर्वाधिक प्रसूती डागा रुग्णालयात झाल्या. पहिल्या बारा तासात २७ प्रसूती झाल्या. यात १३ मुली आणि १४ मुले जन्माला आली असल्याची मिळाली. तर मेयो रुग्णालयात पहिल्या बारा तासात केवळ ११ मुले जन्माला आली. यात ६ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे. मुलींच्या जन्माचा दिवस साजरा करुया अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: कधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र? नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू

मुलींच्या जन्माचा टक्का वाढला

नागपूरात मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात पहिल्या बारा तासात ६१ अपत्य जन्माला आली. दर दिवसांची आकडेवारी बघत खासगी नर्सिंग होममध्ये दिवसाला तीस ते पस्तीस मुले जन्माला येतात. मेयो-मेडिकल आणि डागातील बाळांच्या जन्मांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरात मुली जन्माला आला. पहिल्या बारा तासात मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
loading image
go to top