Akola News : प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल; लोकसभेच्या मतमोजणी पूर्व तयारीला वेग

लोकसभा निवडणुकीत मतदान आटोपल्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. परंतु प्रशासनामार्फत आतापासूनच मतमोजणीची तयारी करण्यात येत आहे.
4th june vote counting preparation lok sabha election result akola
4th june vote counting preparation lok sabha election result akolaSakal

Akola News : लोकसभा निवडणुकीत मतदान आटोपल्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. परंतु प्रशासनामार्फत आतापासूनच मतमोजणीची तयारी करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी वेग-वेगळी व्यवस्था करण्यात येईल व प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल ठेवण्यात येतील.

याव्यतिरिक्त आठ टेबल हे पोस्टल बॅलेटची मतमोजणी करण्यासाठी सज्ज ठेवण्यात येतील, अशा एकूण ९२ टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात येईल. प्रत्यक्षात ४ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

अकाेला लाेकसभा मतदारसंघातील अकाेला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर, अकाेट, मूर्तिजापूर व वाशीम जिल्ह्यातील रिसाेड या सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईव्हीएम मशीन एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात सीलबंद असून १५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ४ जून रोजी समोर येईल. मतमोजणीची प्रक्रिया १४ टेबलवरून पूर्ण केली जाणार आहे.

मतमोजणीदरम्यान एका फेरीला जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्णत्त्वास जाण्यासाठी मनुष्यबळला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त मतमोजणी परिसरात राहणार आहे.

मूर्तिजापूर मतदारसंघासाठी सर्वाधिक फेऱ्या

अकाेला लाेकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमद्वारे मतमाेजणीची प्रक्रिया १४ टेबलवर पार पडेल. अकाेट व बाळापूर मतदार संघातील मतमाेजणी २५व्या फेरीनंतर (राऊंड) संपेल.

अकाेला पश्चिमची २२-२३, रिसाेडची २४, अकाेला पूर्वची मतमाेजणी २६व्या फेरीनंतर संपेल. परंतु मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३८५ मतदान केंद्र असल्यामुळे या मतदार संघाची मतमाेजणी २७व्या फेरीनंतर संपेल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. दुसरीकडे पोस्टल बॅलेटची मतमोजणी वेगळ्याने ८ टेबलवर करण्यात येईल.

असे लागणार मनुष्यबळ

- ईव्हीएमद्वारे मतमोजणी करण्यासाठी सज्ज ठेवण्यात येणाऱ्या एका टेबलवर तीन कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल. त्यात एक सुपरवायझर, एक सहाय्यक सुपरवायझर व एक मायक्रो ऑब्जर्वर यांचा समावेश असेल.

- पोस्टल बॅलेटद्वारे मतमोजणीसाठी एक एआरओ, एक सुपवायझर, दोन काउंटिंग असिस्टंंट व एक मायक्रो ऑब्जर्वर यांचा समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com