esakal | सर्वोपचारमध्ये वाढविण्यात आले ऑक्सिजनचे ५० बेड्स
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोपचारमध्ये वाढविण्यात आले ऑक्सिजनचे ५० बेड्स

सर्वोपचारमध्ये वाढविण्यात आले ऑक्सिजनचे ५० बेड्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे (Government Medical College Akola) संचालित सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनच्या ५० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. क्षय (टीबी) रुग्णांच्या वार्डात ह्या खाटा वाढवण्यात आल्या आहेत. खाटा वाढल्यामुळे रुग्णालयात आता अधिक रुग्णांवर उपचार करता येणार आहे. (50 oxygen beds were extended in Akola General Hospital)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग कृत्रीम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे.

काही ठिकाणी तर रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वच जिल्ह्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा मुबलक साठा तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनच्या ५० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. संबंधित खाटा क्षय रुग्‍णांच्या वार्डात वाढवण्यात आल्यामुळे आता सदर ठिका सुद्धा कोरोना बाधितांवर उपचार सुरू झाले आहेत.

संपादन - विवेक मेतकर

50 oxygen beds were extended in Akola General Hospital