अकोल्यातील तब्बल ५०० वर्ष पुरातण गोसावी गणेश मंदिर

मनोज भिवगडे
Wednesday, 26 August 2020

 राजराजेश्वर मंदिरा मागे शिवाजी नगर येथे गोसावी यांचे राहणे आहे. येथे ५०० वर्ष जुना मठ आहे. हिंदू धर्म, गोसावी समाजाचा प्रचार प्रसार याच मठाद्वारे पुरातन काळापासून सुरू होते. या मठात पुरातन श्री गणेशाची शेषनागारवर विराजित विलोभनीय मातीची मूर्ती स्थापित आहे. ही मूर्ती ५०० वर्ष पुरातन असल्याचाही दावा केला जातो.

अकोला :  राजराजेश्वर मंदिरा मागे शिवाजी नगर येथे गोसावी यांचे राहणे आहे. येथे ५०० वर्ष जुना मठ आहे. हिंदू धर्म, गोसावी समाजाचा प्रचार प्रसार याच मठाद्वारे पुरातन काळापासून सुरू होते. या मठात पुरातन श्री गणेशाची शेषनागारवर विराजित विलोभनीय मातीची मूर्ती स्थापित आहे. ही मूर्ती ५०० वर्ष पुरातन असल्याचाही दावा केला जातो.

या मठाचा वारसा गोसावी कुटुंबातील तेरावी पिढी चालवत असून, त्यापूर्वीपासून गणेशाची पूजा नित्यनियमाने सुरू आहे.
भक्कम पाया व तटबंधी असलेल्या या वास्तूत श्री गणेशाची मूर्ती कोणी व कधी स्थापित केली याची कल्पना कुटुंबातील सध्या असलेल्या सदस्यांनाही माहिती नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र १६ व्या शतकात गोसावी संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सन्यस्त अनुयायंचा मठ होता. या घरामधे श्री उदयपूरी महाराज यांची समाधी आहे. त्यावर सुद्धा पुरातन अशी शिवलिंग आहे व घराबाजूला श्री राम पूरी महाराज यांचे समाधी मंदिर सुद्धा आहे.

कालांतराने हा सन्यस्थ मठ गृहास्थमाकडे वळला व वशपरंपरा सुरू झाली. सद्यस्थितीत तेरावी पीढी या घरात वास्तव्याला आहे. त्यापूर्वीपासून या मठातील गणेश मंदिरात पूजा सुरू आहे. वारसा पंरपरेनुसार मिळालेल्या माहितीनुसार सध्या तेराव्या पिढीपर्यंतची माहिती उपलब्ध आहे. त्यापूर्वी येथे गोसावी कुटुंबाचे वास्तव्य होते, असा दावा केला जातो. मात्र, त्याचे लिखित स्वरूपात कोणतेही पुरावे नाहीत.

गोसाव्याच्या ओट्‍यावर गजानन महाराजांनी घेतला होता विसावा
लोकमान्य टिळक जेव्हा अकोला येथे आले असता संत श्रेष्ठ गजानन महाराज सुद्धा आले होते. राम मंदिराचे जागेची पाहणी करण्याकरिता बच्चूलालांनी त्यांना जुन्या शहरात आणले; पण गजानन महाराज गोसावी यांच्या ओट्यावरच बसून राहिले व त्यांनी विश्राम सुद्ध केला. त्यानंतर ते सध्या स्थापित असलेल्या राम मंदिराकडे जाऊन येथे मंदिर बाधावे असा कऊल बच्चूलाल यांना देला.

मंदिर कधी बांधले व मूर्ती कोणी स्थापन केली याचा अंदाज नाही. पण, ५०० वर्षांपूर्वीची हे मंदिर असावे. पूरातन इतिहास हा वंशपरंपरेनुसार सुरू आहे. तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, जेनेकरून हिन्दू सांस्कृती व आपले पूर्वज व त्यांचे कार्य आजच्या पिढीला कळवे हाच एक उद्देश्य.
-श्री नंदपुरी रामेश्वरपूरी गोसावी,
शिवाजी नगर जुने शहर, राजेश्वर मंदिरा मागे, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 year old Gosavi Ganesh Temple in Akola