esakal | Akola; विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस
sakal

बोलून बातमी शोधा

Akola; विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस

Akola; विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांचे रविवारी (ता. १३) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ४२ विद्यार्थी व १४ विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्थानिक भरतीया रुग्णालयात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना कोव्हिशील्डची लस देण्यात आली. (56 students going abroad were vaccinated against corona)

हेही वाचा: ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!लसीकरणाशिवाय कोरोनाला आळा घालण्याचा दुसरा कोणता उपाय सध्या उपलब्ध नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: कोरोनाकाळातही १० टक्के पगारवाढ अन् रोजगारही

त्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण देशभर कोरोनात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम मोठ्या संख्येने राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु आता विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी १३ जून रोजी टिळक रोडवरील स्थानिक भरतिया रुग्णालय टिळक रोड येथे सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत विशेष सत्र आयोजित करण्यात आले. त्यामध्ये ५७ विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती महापालिकेचे डॉ. अनुप चौधरी यांनी दिली.

संपादन - विवेक मेतकर
56 students going abroad were vaccinated against corona

loading image