कोरोनाने दोन महिलांचा मृत्यू; जिल्ह्यात आढळले ५६७ पॉझिटिव्ह

567 corona positive has been found in Buldana district
567 corona positive has been found in Buldana district

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २८३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २२६४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५६७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३५९ व रॅपिड टेस्टमधील २०८ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ७०१ तर रॅपिड टेस्टमधील १५६३ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २२६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. उपचारादरम्यान सिद्धार्थ नगर, चिखली येथील ६५ वर्षीय महिला व गोपाल नगर, खामगाव येथील ७८ वर्षीय महिला रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा वीज खांबावर मृत्यू; दुरुस्तीचे काम करताना लागला शॉक 
 
पॉझिटिव्ह आलेले अहवालात बुलडाणा शहरात ७१, बुलडाणा तालुक्यातील करडी ४, सुंदरखेड ४, दुधा ८, धाड ६, चिखली शहरात ३२, चिखली तालुक्यातील गांगलगाव ४, मोताळा शहरात ४, लोणार शहरात ३, लोणार तालुक्यातील सुलतानपूर ८, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ५, हिंगणा ११, खामगाव शहरात १०८, खामगाव तालुक्यातील सुटाळा ४, शेलोडी १४, नांदुरा शहरात २३, मलकापूर शहरात २३, देऊळगाव राजा शहरात ४०, देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगांव जहा ५, जळगाव जामोद शहरात ८, जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रूक ५, बोराळा खुर्द ४, काजेगांव ४, पळशी सुपो ७, मेहकर शहरात २५, मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर ४, सारंगपूर ७, सिंदखेड राजा शहरात १०, सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा ४, साखरखेर्डा ८, शेगांव शहरात ७ अशाप्रकारे जिल्ह्यात ५६७ रुग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे मंगळवार (ता.१६) ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३६२९ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com