RTE Admission : ‘आरटीई’तून ८०१ प्रवेश निश्चित; प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने येत्या दोन दिवसांत प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान पालकांसमोर आहे.
801 admission confirmed from RTE Last two days left for admission education
801 admission confirmed from RTE Last two days left for admission educationSakal
Updated on

Akola: जिल्ह्यातील १९७ खासगी स्वयं अर्थसाहाय्यित शाळांमध्ये एक हजार ९१८ विद्यार्थ्यांना पहिलीसाठी मोफत प्रवेश मिळणार आहे. मात्र, प्रवेशासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असताना केवळ ८०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने येत्या दोन दिवसांत प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान पालकांसमोर आहे.

तालुकास्तरावर सुरू असलेली प्रवेशाच्या अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने पूर्वीच्या ‘आरटीई’च्या प्रवेश नियमांमध्ये बदल करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांचा पर्याय दिला होता.

या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून एक किमी अंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खासगी अनुदानित शाळा नाही, त्यांनाच इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार होता.

पण, या बदलाला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याठिकाणी अंतरिम स्थगिती मिळाल्यावर शालेय शिक्षण विभागाने तो बदल तात्पुरता थांबवून पालकांकडून दुसऱ्यांदा अर्ज भरून घेतले.

त्यानंतर ७ जुलैला प्रवेशाची सोडत तथा लॉटरीदेखील निघाली, मात्र न्यायालयाच्या अंतिम निर्णयामुळे प्रवेशप्रक्रिया पुढे सरकली नव्हती. उच्च न्यायालयाने तो बदल रद्द ठरविल्याने विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोला जिल्ह्यात आरटीई पात्र १९७ खासगी शाळा आहेत.

801 admission confirmed from RTE Last two days left for admission education
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 428 शाळांमध्ये 4807 विद्यार्थ्यांची निवड

त्यामध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाच्या २०१४ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी सुमारे चार हजार ८८९ पालकांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक हजार ९१८ विद्यार्थ्यांना आरटीईतून इयत्ता पहिलीला प्रवेश मिळणार आहे. मात्र, पडताळणीची प्रक्रिया किचकट असल्याने ३१ जुलै पर्यंत असलेली मुदत वाढवून देण्याची मागणी पालकभांकडून होत आहे.

अनेकांना मेसेज नाही

प्रवेशपात्र काही पालकांना मेसेज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पालकांनी केवळ मोबाइलवरील एसएमएसवर अवलंबून न राहता अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली की नाही याची खात्री पोर्टलवरून करावी. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन लॉटरीतून नंबर लागलेल्यांची यादी पाहता येणार आहे. प्रवेशासाठी मेसेज आलेल्या पालकांनी ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील तालुकास्तरावर पडताळणी करून बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले.

801 admission confirmed from RTE Last two days left for admission education
RTE Admission : जिल्ह्यात आजपासून आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया

अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली, ती सर्व मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे घेऊन जावे लागणार आहे. पालकांनी केवळ मोबाइलवरील एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीईच्या पोर्टलवर खात्री करावी. येत्या ३१ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे.

— रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com