esakal | अकोला : होता अक्षय म्हणून मिळाली ‘त्या’ माऊलीला मदत!
sakal

बोलून बातमी शोधा

होता अक्षय म्हणून मिळाली ‘त्या’ माऊलीला मदत!

होता अक्षय म्हणून मिळाली ‘त्या’ माऊलीला मदत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मानवी जीवन अतिशय रोमांचकारी आणि अनुभव पूर्ण आहे. कोणत्या वेळी कोणती समस्या उभी राहील किंवा रोमांचक किस्सा घडेल याचा नेम नाही. पण दैवी कृपेने मिळालेल्या या मानवी जीवनात देवाचा अंश असल्याचा एक सुखद अनुभव मंगळवारी अकोल्यातील अक्षय जोशी या युवकाने अनुभवला. होता अक्षय म्हणून रस्त्यावर प्रसुती झालेल्या महिलेला व तिच्या बाळाला जीवनदान मिळाले.

काही कामा निमित्त अक्षय मंगळवारी रात्री रणपिसे नगरमधून डाबकी रोडकडे जात होता. रस्त्यात अभाविपचे कार्यकर्ते वॉल रायटिंग करताना भेटले. त्यांच्याशी बोलून पुढे जाताच तर निशांत टॉवर समोर रस्त्याचा कडेला एक महिला रस्त्यावर झोपलेली दिसली. ती महिला गरोदर होती आणि अचानक प्रसुती वेदना सुरू होऊन त्याच ठिकाणी कोणत्याही डॉक्टर, नर्सच्या अनुपस्थितीमध्ये एका गोड निरागस छकुलीला तिने रस्त्यावरच जन्म दिला. मध्य रात्रीचे १२.३० वाजलेले.

काही मिनिटा आधीच प्रसूती झालेली बायको आणि हातात मुलगी रस्त्याच्या कडेला बसून कोणी मदतीला येईल का म्हणून आशेने वाट पाहणारा तो गरीब बाप. म्हातोडीचे राहणार हे कुटुंब रात्री दुचाकीनेन दवाखान्यात जायला आले; पण रस्त्यातच बायकोला वेदना सुरू झाल्या म्हणून थांबले आणि असहाय्य वेदना होत आहेत म्हणून जीवाचा आकांत करणारी बायको पाहून स्थब्द झालेल्या त्या काकांच्या डोळ्यात पाणी आले.

हेही वाचा: CM बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत; प्रियांकांच्या भेटीसाठी जाताना अडवलं

रस्त्यावर झोपलेली बाई बघून अक्षय व त्यांचे मित्र तेथे थांबलो. तातडीने डॉ.वखारिया यांच्या दवाखान्यातील नर्स आणि स्टाफला बोलावून पुढील प्रक्रिया पूर्ण करून आई आणि बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलं. यावेळी अक्षय जोशी सोबत भाजपचे कार्यकर्ते हर्षल अलकरी, अभाविपचे कार्यकर्ते विराज वानखडे, देवाशिष गोतरकर, जय आढे, मयुरेश हुशे, कौशल राऊत, आदित्य केंदळे, राजू भाऊ आदी उपस्थित होते.

बापाच्या चेहऱ्यावर समाधान

अडचणीच्या काळात अनोळखी असलेले हे पोरं धावपळ करत आहेत हे पाहून त्या काकांना अश्रू अनावर झाले; पण आपल्या बायकोचा आणि मुलीचा जीव वाचला हे पाहून समाधान ही त्यांच्या चेहऱ्यावर होते.

स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मुजोरी

या संपूर्ण प्रकरणात एक वाईट अनुभव मदतीला धावून आलेल्या युवकांना आला. जिल्हा स्त्री रुग्णालयात पेशन्टला दाखल करताना अतिशय मुजोर आणि निष्काळजी पणाचा कळस गाठलेली शासकीय व्यवस्था पाहायला मिळाली. रुग्ण दारात उभा असताना साधा एक कर्मचारीसुद्धा येऊन पाहायला तयार नव्हता. रुग्णालयांना इतकी साधनं दान केली जातात; पण ऐन वेळेवर साधं एक स्ट्रेचर मिळू नये आणि विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळाली. रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पाऊल उचलायचे सोडून, सहकाऱ्याची भूमिका न घेता फक्त अरेरावी आणि उद्धट वागणूक देणार हे रुग्णालय प्रशासन बघून मदतीला धावलेल्या युवकांचा संताप अनावर झाला होता.

loading image
go to top