esakal | डाक विभागातच होणार आधार कार्ड मोबाईलशी लिंक!
sakal

बोलून बातमी शोधा

डाक विभागातच होणार आधार कार्ड मोबाईलशी लिंक!

डाक विभागातच होणार आधार कार्ड मोबाईलशी लिंक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : आधार कार्डचा क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे अनेक ऑनलाइन योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या अडचणी अधिक प्रमाणात येत असल्याने डाक विभागाकडून त्यासाठी विशेष मोहीम अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविली जात आहे.

डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमार्फत ग्रामीण भागात ता. १ ऑक्टोबरपर्यंत आधार कार्डला मोबाईल लिंक करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. पोस्टमन किंवा जवळील पोस्ट ऑफिस येथे आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे. अकोला डाक विभागातील ४५ उपडाकघर तसेच ३५४ शाखा डाक घरांमधून ही सुविधा दिली जाणार आहे. ही मोहीम ग्रामपंचायतस्तरावर देखील राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल नंबर असणे आवश्यक राहील. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी नजिकच्या टपाल कार्यालयात किंवा आपल्या क्षेत्रातील पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा.या सेवेकरीता पन्नास रुपये शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती डाक विभागाव्दारे देण्यात आली आहे.

यासाठी ठरणार फायदेशीर

पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्टकरिता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्जाकरिता, बँक तसेच डिमॅट खाते उघडण्यासाठी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी, आधार कार्ड तयार करणे किंवा किरकोळ बदल करणे, आधार कार्डचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आधार कार्ड-मोबाईल लिंक केल्यामुळे फायदा होणार आहे.

loading image
go to top