खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण

खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण

अकोला : डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना मारहाण करीत जिममध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. आरोपीमध्ये एका नगरसेवकाच्या भावाचाही समावेश

गोडबोले प्लॉट येथील रहिवासी रिजवान अहमद शेख रहिमत (वय ३४ वर्षे) हे प्रॉपर्टी ब्रोकर आहेत. त्यांना हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पाच आरोपींनी सुमारे तीन लाखांची खंडणी मागितली. या खंडणी मागणाऱ्या टोळीमध्ये जोगळेकर प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद जावेद इक्बाल, बॉडी बिल्डर सय्यद मोहम्मद सय्यद हुसेन व महमूद मास्टर यासह आणखी दोघांचा समावेश आहे. या पाच आरोपींपैकी मोहम्मद जावेद इक्बाल याने ता. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रिजवान अहमद शेख रहिमत यांना घरासमोर बोलावले.

त्यानंतर एमएच ३० एझेड ३१३१ क्रमांकाच्या इकोस्पोर्ट कारमध्ये जबरदस्तीने डांबून त्यांना टॉवर चौकातील गॅलेक्सी जिममध्ये आणले. यावेळी या तीन जणांनी तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर रिजवान रहिमत यांना बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैसे न दिल्यास संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रॉपर्टी ब्रोकरच्या खिशातील २० हजार रुपयांची रक्कमही या आरोपींनी काढून घेतली. प्रॉपर्टी ब्रोकरणे त्यांना पैसे देण्याचे कबुल करून घेत स्वतःची सुटका करून घेतली. घरी परतल्यानंतर संपूर्ण कुटुंबीयांनी डाबकी रोड पोलिस स्टेशन गाठून अपहरण करून मारहाण करीत खंडणी मागितल्याची तक्रार दिली. डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४२, ३८६, ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Web Title: Abduction Of Property Broker For

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akolacrime
go to top