

Bribery Allegations Against Police Staff in Akola
Sakal
अकोला : अकोला जिल्ह्यातील दहीहांडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने नागरिकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्याला रंगेहात पकडले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असताना त्यात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याबरोबरच त्याचा रायटर म्हणून काम करणाऱ्या विनोद खेडकर याचीही या लाच व्यवहारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एसीबीने खेडकरलाही अटक केली असून, ही कारवाई संपूर्ण पोलिस यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरली आहे.