
सिंदखेड राजा : समृद्धी महामार्गावर मुंबईकडे जाणारा ट्रक अचानक नादुरुस्त झाला असल्यामुळे नादुरुस्त ट्रक सिंदखेड राजा टोल प्लाझा कडे घेवून जात असताना विचित्र अपघात होवून पाठीमागून येणाऱ्या गॅस टँकरला धडक दिली. यामुळे गॅस टँकर चालक जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.