Accident News : तुरीने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला; रात्रीच्या सुमारास घडली घटना

Pandharpur Accident 3 women died  six seriously injured when a truck rammed into a crowd
Pandharpur Accident 3 women died six seriously injured when a truck rammed into a crowd sakal

बाळापूर (जि.अकोला : तुरीची पोती घेऊन जाणारा ट्रक पुलावरून खाली कोसळल्याची घटना वाडेगाव-बाळापूर मार्गावरील मांडवा फाट्या नजीक घडली. या अपघात दोन जण जखमी झाले आहेत, तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Pandharpur Accident 3 women died  six seriously injured when a truck rammed into a crowd
NAFED : शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्याला शेतमाल खरेदीचे उद्दीष्ट मिळाले वाढवून

वाडेगाव कडून इटारसीकडे जात असलेला एमपी-०९-एचजी-३८७२ या क्रमांकाचा ट्रक मांडवा फाट्या समोर वघाडी नाल्यावरील पुलावरून खाली कोसळला. ट्रकमध्ये वाडेगाव येथील व्यापाऱ्यांची तूर भरलेली होती. तुरीने भरलेला ट्रक वाडेगाव कडून इटारसी येथे जात होता. मांडवा फाट्याजवळ असलेल्या नाल्यावरील अरुंद पुलामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही या अरुंद पुलावरून अपघात झालेले आहेत. या अपघातात जीवित हानी झाली नसून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ड्रायव्हर-क्लिनर दोघेही जखमी झालेले आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Pandharpur Accident 3 women died  six seriously injured when a truck rammed into a crowd
Raj Thackrey: '...परत त्यांना मतदान केलंत तर चाबकाने मारीन'! राज ठाकरेंनी भरला दम

संबंधित विभागाने या नाल्यावरील अरुंद पुलाचे रुंदीकरण करावे, तेथे सूचनाफलक लावावे, अशी मागणी होत आहे. सूचना फलक नसल्याने यापूर्वी अपघात झालेले आहेत व काल रात्री सुद्धा या पुलावरून तुरीने भरलेला ट्रक पुलाच्या खाली उलटला तरी संबंधित विभागाने याची त्वरित दखल घेऊन पुलाचे रुंदीकरण करून पुलाच्या बाजूने सूचना फलक लावावे अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com