Court
sakal
अकोला - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गरोदर पत्नी व मुलीची हत्या केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मनिष किसनराव म्हात्रे (वय-३४, रा. देशमुख फैल, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला) याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.