esakal | बापरे! टेस्ट शिवाय ट्रीटमेंट, रेमडेसिव्हिअरचाही वापर

बोलून बातमी शोधा

बापरे! टेस्ट शिवाय ट्रीटमेंट, रेमडेसिव्हिअरचाही वापर
बापरे! टेस्ट शिवाय ट्रीटमेंट, रेमडेसिव्हिअरचाही वापर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः विना परवानगी अवैधरित्या काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन खासगी रुग्णालयांना महापालिकेने एकूण १० लाखांचा दंड ठाेठावला आहे. संबंधितांनी १५ दिवसाच्या आत दंड न भरल्यास दोन वर्षांची शिक्षा हाेणार आहे. मनपाने केलेल्या पाहणीत या तिन्ही रुग्णालयांमध्ये चाचणीविनाच कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते. विशेष म्हणजे, रेमडेसिव्हिअर औषधांचाही वापर सुरू होता. चाचणी न केल्याने रुग्णांचे नातेवाईक हायरिक्समध्ये असताना शहरात फिरत असल्याने मनपाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

हेही वाचा: 'नितेश राणे हे बेडकांचे पिल्लू आहे', आमदार पुन्हा बरसले

कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. गतवर्षी काेराेनाचा प्रादुर्भाव सुरू होताच रुग्णसेवेसाठी प्रशासनाकडून खासगी डाॅक्टरांना आवाहन करण्यात येत हाेते. खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याची विनंती करावी लागत हाेती. त्यानंतर जिल्हा प्रशासानाने काेराेना बाधितांवर उपचारसााठी खासगी रुग्णालयांना परवानगी दिली.

हेही वाचा: Video: थरारक; आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस ठाण्यात घेतले विष