esakal | ॲड. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुटीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash-Ambedkar

ॲड. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुटीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी एक चित्रफित प्रसिद्ध करून तीन महिन्याच्या सुटीवर जात असल्याचे जाहीर केले. या काळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखाताई ठाकूर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Adv. Prakash Ambedkar on three months leave)


वंचित बहुजन आघाडीचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेसह राज्यातील पाच प्रमुख जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीची लगबग सुरू असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धक्का देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली आहे. प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
राज्याच्या राजकारणासाठी आश्चर्यजनक मानल्या जाणाऱ्या या निर्णयाचे पडसाद काय उमटतील, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. त्यांनी तीन महिने विश्रांती घेण्यामागील नेमके कारण काय, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

हेही वाचा: दर्शन घेऊन परतणाऱ्या चार युवकांवर काळाची झडप

वैयक्तिक कारणास्तव विश्रांती
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या चित्रफितीमध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव तीन महिने विश्रांती घेत असून, सक्रिय राजकारणातून बाजूला राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने सर्वच संभ्रमात आहेत.

हेही वाचा: आघाडीत बिघाडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांसमोर

काय म्हणाले ॲड. आंबेडकर?
‘मी तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. व्यक्तिगत कारणासाठी मी विश्रांती घेत आहे. या काळात पक्ष चालला पाहिजे, संघटना चालली पाहिजे. आपण जे आंदोलन सुरू केले ते पुढे सुरू राहिले पाहिजे. पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. म्हणूण पक्षाला अध्यक्ष हवा आहे. त्यासाठी रेखाताई ठाकूर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. डॉ. अरुण सावंत, महाराष्ट्र कमेटी, जिल्हा कमेटी, सर्व कार्यकर्ते यांनी त्यांना सहकार्य करून विजयाकडे वाटचाल करावी.’

Adv. Prakash Ambedkar on three months leave

loading image