esakal | आघाडीत बिघाडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांसमोर
sakal

बोलून बातमी शोधा

आघाडीत बिघाडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांसमोर

आघाडीत बिघाडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांसमोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारंजा लाड ः जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग रंगणार, अशी चर्चा असताना भामदेवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्व पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे, आता जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत आघाडी विषयी चर्चेंना उधान आले आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress, NCP, Shiv Sena in front of each other)

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


कारंजा लाड तालुक्यातील भामदेवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसकडून वैशाली मेश्राम उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपाध्यक्ष अरुण ताथोड यांचा पत्नी वर्षां ताथोड यांनीही अर्ज दाखल केला. त्यात शिवसेनानेही उडी मारीली आणि ज्योती उगले यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे भामदेवी गटामध्येतरी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने या सर्कलमध्ये नवीन उमदेवार माया करडे यांना संधी देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद लळे यांच्या पत्नी वैशाली लळे यांनी आपली उमेदवारी दाखल करून आपली दावेदार दाखवून दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कारंजा तालुक्यातील भामदेवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुजाता वानखडे या अपक्ष उमेदवारांसह एकूण ७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा: पोटनिवडणूक; आठ उमेदवारांचे अर्ज बाद


मोहगव्हाण पंचायत समिती गणासाठी वंचित बहुजन किशोर कुलकर, अपक्ष विनोद नंदागवळी, भाजपकडून संजय लाहे, काँग्रेसकडून गजानन मिसाळ, बसपा रवी लांजेवार, शिवसेना जितेंद्र विठ्ठलराव, काँग्रेस गणेश लाडकर, सागर कर, पोहा पंचायत समिती गणामधून वंचितच्या आरती राठोड, भाजपच्या स्वाती अवताडे, काँग्रेसच्या ललिता चव्हाण आणि रेखा चव्हाण, शिवसेनाच्या कलाबाई चव्हाण, धामणी खडी पंचायत समितीमधून भाजपचे दिनेश वाडेकर, वंचितचे रुपेश शहाकार, काँग्रेसचे शंकर नेतनकर, शिवसेनेचे नथुजी राजगुरे, अपक्ष भार्गव भगत, उंबर्डा बाजार पंचायत समितीसाठी वंचितच्या कविता जेंदळे आणि करुणा कांबळे, काँग्रेसच्या लक्ष्मीबाई हळदे, अपक्ष नंदा वानखडे आणि शमुबाई चव्हाण, भाजपच्या लता परसनकार, अशा उमेदवारांनी शेवटच्या दिवसी उमेदवारी दाखल केली आहे.

हेही वाचा: मोबाईलवर बोलताना वेगात आलेल्या ऑटोच्या अपघातात युवतीचा मृत्यू


तालुक्यातील भावी राजकारणाची रंगीत तालीम
जिल्हा परिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली, तर भावी विधानसभा निवडणुकीत वेगळे राजकीय गणित आकाराला येण्याची शक्यता आहे, मात्र आघाडी झाली नाही, तर कारंजा तालुक्यात राजकीय बाजाराची परंपरा कायम राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संपादन - विवेक मेतकर

Congress, NCP, Shiv Sena in front of each other

loading image