प्राण गेले तरी, आता माघार नाही; तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राण गेले तरी, आता माघार नाही : तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन

प्राण गेले तरी, आता माघार नाही; तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन 17 नोव्हेंबरपासून सुरू केले होते. दरम्यान, रात्री 11.30 वाजेदरम्यान श्री तुपकर यांना नागपूर पोलिसांनी अटक करत, आज( ता.18) सकाळी बुलडाण्याच्या अष्टविनायकनगरातील घरी

आणले. श्री. तुपकर यांनी तेव्हापासून घरासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. प्राण गेले तरी मागे हटणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत अन्‍नाचा कणही खाणार नाही, असे म्हणत अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू ठेवला आहे. स्वाभिमानी संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचा मार्गदर्शनात आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला होता. त्याची सुरवात

नागपुरातील संविधान चौकातुनअन्‍नत्याग सत्याग्रह सुरुवात करण्यात आली. परंतु, आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू होते. त्यामुळे रात्री 11.30 वाजेदरम्यान पोलिसांनी कायदा, सुव्यवस्‍था आणि १४४ कलम लागू असल्याने त्यांना अटक केली. अटकेपूर्वी पोलिसांनी तुपकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रविकांत तुपकरांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूर-अमरावतीमार्गे बुलडाण्यात आणण्यात आले. तब्येत बरी नसल्याने त्यांना पोलिसांनीही अन्‍न घ्या, अशी विनंती प्रवासादरम्यान केली. मात्र तुपकरांनी विनंती फेटाळली. सकाळी बुलडाण्यात दाखल झाल्यानंतर घरासमोर मंडपात बसून त्यांनी अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला. यावेळी नागपूर व बुलडाणा पोलिसांचा कडा पहारा त्यांच्या निवासस्थानसमोर लावण्यात आला आहे.

प्रतिज्ञा घेतली आहे ती मोडणार नाही

नागपूर पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही करून मला अटक केली. मात्र कुठेही नेण्यात आले तरी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत अन्‍नत्याग आंदोलन सुरूच ठेवेन अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे निवासस्थानाबाहेर सुद्धा हा अन्‍नत्याग सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.

आंदोलन अधिक तीव्र होणार

एल्गार आंदोलनात आज (ता.१८) गावागावात शेतकरी पारावर व चावडीवर धरणे आंदोलन करणार आहे. उद्या (ता.19) रास्तारोको तर २० नोव्हेंबरला कडकडीत गावबंद पाळण्यात येणार आहे. या आहे प्रमुख मागण्या शासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आता माघार घेणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट करत,

सोयाबीनला किमान ८ हजार, कपाशीला १२ हजार रुपये भाव जाहीर करावा. सोया पेंडची आयात थांबवावी, १०० टक्के पीकविमा, शेतातील लोडशेडिंग व कनेक्शन कापणे बंद करा, सक्तीची वीज वसुली बंद करा, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करा आदी मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू आहे.

loading image
go to top