esakal | एजेंसीमधून ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

बोलून बातमी शोधा

एजेंसीमधून ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

एजेंसीमधून ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारंजा ः कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने संपूर्ण देशात ऑक्सिजन अभावी बरेच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्या संदर्भाने पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशीम जिल्ह्यातील कारंजा भागात गुन्हेगारी वॉच पेट्रोलिंग करीत असतानाच सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता शहर पोलिस ठाणे हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारावर पोलिसांनी कारंजा ते नागपूर रोडवरील यशोतीरथ कॉलनी महाराष्ट्रनगर मधील हिंदुस्थान स्केप या ठिकाणी छापा टाकला असता, संशयितरित्या बोलेरो पिकअप या गाडीतून एका ट्रकमध्ये ऑक्सिजनचे ६४ सिलिंडर आढळून आल्याने पोलिसांनी ते सिलिंडर जप्त केले.

मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र नगरातील हिंदुस्थान स्केप या ठिकाणी पहाणी केली असता, एमएच-२९-एटी-०८१८ बोलेरो पिकअप मालवाहू गाडीतून ट्रक क्रमांक एमएच-२१-६००१ मध्ये काही इसम ऑक्सिजन सिलिंडर भरताना आढळून आले. संशयावरून सदर सिलिंडरची अधिक माहिती घेतली असता, पिकअप वाहनात एकूण २९, ट्रक व न्यू हिंदुस्थान एजेंसी दुकानात एकूण ९ रिकामे सिलिंडर आढळून आले. सदर बाबत दुकानाचे मालक रियाज अहमद गुलाम रसुल (वय ४०) रा.झोयानगर कारंजा लाड यांचेकडे विचारना केल्यानंतर त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर व्यावसायचे त्याचेकडे परवाना असून, न्यू हिंदुस्थान एजेंसी नावाने असल्याचे सांगितले.

सिलिंडरची नागपूर येथून खरेदी केल्याचेही त्यांच्याकडून सांगिण्यात आले. कागदपत्रांची तपासणी केली असता, पोलिसांचे समाधान झाले नसल्याने त्या ठिकाणावरून ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर, बोलेरो पिकअप वाहन, ट्रक असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येणार असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई जिलाह पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सपोनि अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलिस नाईक किशोर चिंचोळकर, मुकेश भगत, अमोल इंगोले, पोलिस शिपाई राम नागुलकर, प्रवीण राऊत, चालक राठोड यांनी केली.