...अन् कृषी सचिव दुचाकीवरून पोचले बांधावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् कृषी सचिव दुचाकीवरून पोचले बांधावर

...अन् कृषी सचिव दुचाकीवरून पोचले बांधावर

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : राज्याचा कृषी सचिव म्हटलं की मोठा थाट. मात्र, याला फाटा देत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कोणताही बडेजाव न करता शासकीय वाहन सोडून चक्क दुचाकीवरून २ किलोमीटर बांधावर पोचत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांची शेतकर्‍यांशी व शेतीशी असलेले नाळ घट्ट असल्याचेच पाहायला मिळाली.

सिंदखेड राजा तालुक्यात शासकीय दौऱ्यावर असलेले कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले हे शासकीय वाहन सोडून चक्क दुचाकीवरस्वार होत पाहणी दौरा केला. राज्यांच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेला प्रशासनाचा अधिकारी चक्क दुचाकीवरून पिके पाहण्यासाठी शेतात पोचल्याने सर्वांनी कुतूहल व्यक्त केले. पीक पाहणी करताना बडे अधिकार्‍यांच्या ताफ्यात अनेक वाहने पाहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक अधिकारी सुद्धा रस्त्यालगत असलेल्या शेताची व पिकांची पाहणी साठी निवड करत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांची खरी परिस्थिती वेगळी असते त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अनेक वेळेस नाराजीचा सूर पाहायला मिळतो.

यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले हे परिस्थितीच्या उलट पाहिला मिळाले त्यांनी तालुक्यातील निमखेड गावांत दुचाकीने जाऊन शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. शेतकर्‍यांसोबत विविध पिका बाबत चर्चा केली, कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते काय? ते विचारला असता शेतकर्‍यांनी मिळत असल्याचे सांगितले व समस्येचे निराकरण सुद्धा केले जात असल्याचे सांगितले.

निमखेड गावात ९७ हेक्टरवर करडी पिकांची लागवड केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी करडी पिकांचा प्रचार प्रसार करून शेतकर्‍यांमध्ये जनजागृतीचे काम केले. त्यामुळे तालुक्यातील १८ गावामध्ये १५० हेक्टर पेक्षा जास्त करडी पिकांची लागवड केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी कृषी ए. के.मिसाळ,तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्यासह कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

शेतकर्‍यांकडून पुढील वर्षासाठी सोयाबीन पिकाचे नियोजन

गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे अनेक वेळेस पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकर्‍यांकडून पुढील वर्षासाठी सोयाबीन पिकाचे नियोजन केल्या जात आहे. गेल्या काही वर्षापासून सोयाबीन बियाणांचा तुटवडा शेतकर्‍यांना जाणवत असल्यामुळे शेतकर्‍यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेले सोयाबीन पुढील वर्षासाठी पेरणी साठीचे नियोजन करताना सद्या शेतकरी पाहायला मिळत आहे.कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन शेतकर्‍यांना केला जात आहे.

loading image
go to top