'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee narendra modi

'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरुद्ध पुन्हा एकदा संघर्ष छेडला आहे. सध्या त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीमध्ये 'त्रिपुरा'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्रिपुरातील हिंसाचार तसेच सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) कार्यकक्षा वाढविणे हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचं त्यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितलं आहे. मोदी यांच्या बरोबरील भेटीत राज्याशी संबंधित विविध मुद्देही उपस्थित करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: MPSC: PSI पदासाठी नाशिक केंद्रावरील नियोजित मुलाखती ढकलल्या पुढे

त्रिपुरात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. त्याच्या निषेधार्थ तृणमूल खासदारांना दिल्लीत धरणे आंदोलन केले आहे. त्यात आपण कदाचित सहभागी होणार नाही, पण त्यांना नक्कीच पाठिंबा दर्शवू, असेही ममता यांनी सांगितलं आहेो. ईशान्येकडील राज्यांत पाशवी बळाचा वापर होत असल्याचा दावा करून मानवी हक्क आयोग याची दखल का घेत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब आणि त्यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत आहे. सामान्य जनतेला त्यांनी उत्तर द्यायला हवे. कायद्यानुसार त्यांच्या सरकारविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून वरच्या न्यायालयात धाव घेऊ, असे ममता यांनी सांगितले.

हेही वाचा: 'अर्धी लढाई जिंकलीय', आता...का म्हणाली क्रांती रेडकर असं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीसाठी कायद्यानुसार निवडणूकविषयक हक्क तसेच शांततापूर्ण आणि सामान्य पद्धतीने प्रचार करण्यापासून कोणत्याही राजकीय पक्षाला रोखू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा सरकारला दिला आहे.

‘अमित शहांना सौजन्य नाही‘

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर ममता यांनी तोफ डागली. त्रिपुरातील हिंसाचारावरून तृणमूलच्या खासदारांनी बैठकीसाठी वेळ मागूनही शहा यांनी भेटण्याचे सौजन्य दाखविले नसल्याचा दावा त्यांनी केला.

loading image
go to top