akola airport
sakal
अकोला - अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता राज्य शासनाने सुमारे २०९ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता दिली आहे. ही दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत असून खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हावासियांतर्फे आभार मानले आहेत.