पाणीपुरवठा योजनेवरुन खडाजंगी!, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा; सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद

akola water supply scheme !, Zilla Parishad standing committee meeting; Disputes between the ruling-opposition
akola water supply scheme !, Zilla Parishad standing committee meeting; Disputes between the ruling-opposition

अकोला  ः पातुर तालुक्‍यातील पांढुर्णा गावातील पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन निविदा स्वीकृत नसल्यानंतर सुद्धा झाल्याचा मुद्दा स्थायी समितीत वादाचा ठरला. निविदा स्वीकृत नसताना सुद्धा भूमीपूजन कसे करण्यात आले, हा मुद्दा भारिपचे गटनेता ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी उपस्थित केला.

कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची मागणी त्यांनी केली. त्याला शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी विरोध करत जिल्हा परिषदेत पाण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप केला. सदर वाद वाढत असतानाच अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सभा संपल्याची घोषणा अध्यक्ष प्रतीभा भोजणे यांनी केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आदिवासी बहुल गाव व परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत आमदार नितीन देशमुख यांनी शासनाकडून 52 लाखांचा निधी मंजूर करुन आणला. या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात येवून ई-निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली. परंतु निविदा स्वीकृतीच्या ठरावाला जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी देण्यात आली नाही. सदर कामाचे भूमीपूजन देखील करण्यात आले. या मुद्यावर सोमवारी (ता. 6) स्थायी समितीच्या सभेत भारिपचे गटनेता ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी आक्षेप घेतला. परिसरातील सर्कलचे सदस्य असल्यानंतर सुद्धा या विषयी त्यांना अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी सदस्य सुनिल फाटकर यांनी केली. त्यावर संबंधित उपअभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांनीच उंबरवाडीला जाण्याचे निर्देश दिल्यामुळे भूमीपूजनाला गेलो होतो, अशी माहिती सभागृहात दिली. परंतु सदर प्रकार गंभीर असल्याने संबंधित उपअभियंता व शाखा अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी सदस्य ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी लावून धरली. शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर याचा विरोधक करत असतानाच सभागृहातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. सभेत सभापती पदी अध्यक्ष प्रतीभा भोजणे, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, सभापती पांडे गुरुजी, आकाश सिरसाट, मनीषा बोर्ड, पंजाबराव वडाळ, इतर जिल्हा परिषद सदस्य व सर्वच विभांचे अधिकारी उपस्थित होते.

बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्यांना मदतीचा ठराव
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केल्यानंतर सुद्धा बियाणे उगवल्याने नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. या स्थितीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी करण्याचा ठराव, सदस्य गोपाल दातकर यांनी मांडला. त्याला सर्वच सदस्यांनी मंजुर केले.

इतर मुद्यांवर चर्चा

  • विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट, मोजे पुरवण्याच्या योजनेसाठीची रक्कम शिक्षकांच्या पगारातून कपात करण्यात आल्याचा मुद्दा सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी उपस्थित केला. या विषयाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत दिली.
  •  कोरोनाच्या काळात शासकीय 108 ऍम्बुलंस नादुरुस्त आहेत. त्यांना अकोला वगळून अमरावतीला पाठवण्यात येत असल्याचा मुद्दा जि.प. सदस्य ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी उपस्थित केला. याविषयी गजानन पुंडकर यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com