अकोला ः जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून ते शनिवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे पऱ्हाटीचे पीक बऱ्यापैकी दिसत आहे. मात्र, सोयाबीन, तूर, मूग, उडिदाच्या पिकासाठी अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एरव्ही मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पाऊस पडून हगामाच्या कामांना सुरुवात होते आणि जूनच्या पहिल्या किंवा फार फार तर दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून धडकायचा. गेल्या काही वर्षात मात्र ऋतूचक्रातच आमुलाग्र बदल झाला असून, तीन वर्षापासून मॉन्सून सुद्धा जवळपास १५ दिवस लांबला आहे. शिवाय गेल्यावर्षी व यंदाही मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात पूर्णपणे दांडी मारली असून, नियमित मॉन्सूनसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
एरव्ही ६५ ते १०० मि.मी. किंवा जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यानंतरच खरीप पेरणी करण्याच सल्ला कृषी विभाग तसेच कृषी तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यानुसार यंदाही ७५ मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. शनिवारपर्यंत जिल्ह्यात १४६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, बहुतांश भागात कपाशी व सोयाबीन, मूग, उडीद, तुरीची पेरणी आटोपली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे व जेथे १०० ते १५० मि.मी. पाऊस पडला तेथे कपाशीच्या पिकाची स्थिती चांगली आहे. परंतु, सोयाबीन उत्पादकांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात ४ जूनपर्यंत पडलेला पाऊस
तालुका |
जूनपासूनचा पाऊस |
(मि.मी. टक्केवारी) |
अकोला |
१४५.८ |
२१.४ |
तेल्हारा |
१८४.७ |
२७.८ |
बाळापूर२४.४ |
१४१.५ |
२३.० |
पातूर |
१९५.२ |
२४.४ |
अकोट |
१३९.२ |
१९.८ |
बार्शीटाकळी |
१४२.१ |
२०.३ |
मूर्तिजापूर |
११०.३ |
१५.५ |
एकूण सरासरी |
१४६.९ |
२१.१ |
मस्कत आणि ओमानच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने, राज्यात येणाऱ्या मॉन्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील २४ तासात स्थिनिक वातावरण बदलानुसार विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर
|