अकोला : अठरा दिवसांत १.६३ लाख नागरिकांनी घेतली कोरोनाची लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

अकोला : अठरा दिवसांत १.६३ लाख नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

अकोला ः नोव्हेंबर महिन्यात शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यात हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ६३ हजार ७९६ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. त्यामध्ये १ लाख २० हजार १२० लाभार्थ्यांनी कोरोनाचा पहिला तर ४३ हजार ६७६ लाभार्थ्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. त्यासाठी कोरोना लसीकरणाचे २ हजार ६० सत्र घेण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेत आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी अद्याप कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार आगामी १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले असून आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यासोबतच हर घर दस्तक अभियान राबवून कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

असे करण्यात आले लसीकरण (नोव्हेंबर)

  •  पहिला डोस - १ लाख २० हजार १२० नागरिक

  •  दुसरा डोस - ४३ हजार ६७६ नागरिक

  •  दोन्ही डोस - १ लाख ६३ हजार ७९६ नागरिक

  •  लसीकरण सत्र - २ हजार ६०

loading image
go to top