
अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत शेतकरी आत्महत्येचे ३० प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी निकषात न बसणाऱ्या ८ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले, तर तीनची फेरचौकशी होणार आहे. यावेळी २० प्रकरणांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.