Akola : जीवरक्षकांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : जीवरक्षकांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

मूर्तिजापूर : जीवरक्षक आपल्या जिवाची पर्वा न करता अपघातग्रस्तांना मदत करतात व जीवरक्षण करतात, मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना मानधन मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन आरपीआय (आंबेडकर) पक्षाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख व ठाणे जिल्हा महासचिव सचिन कोकणे यांनी त्यांना दिले.

आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या, त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणाऱ्या व मृतदेहांच्या उत्तरीय तपासणी प्रक्रीयेत मोलाची भूमिका बजावत निराधारांच्या अंत्यसंस्काराचे धर्मकार्य निस्वार्थ भावनेने करणाऱ्या जीवरक्षकांचा आज सत्कार करण्यात आला.

येथील विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आरपीआय (आंबेडकर) चे विदर्भ कार्याध्यक्ष आर.जी.नितनवरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव कैलास मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे, जीवरक्षक सुनील लशुवाणी, ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन आरपीआय (आंबेडकर)चे जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांनी केले. सर्पमित्र मून्ना श्रीवास, निमोनियाग्रस्त रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधी देणारे राजेश गुप्ता यांच्यासह दीपक सदाफळे, सुनील लशुवाणी, सेनापती शेवतकर, स्वप्निल चौधरी, विक्की गावंडे, बादशहा, अमोल खंडारे, आदित्य इंगळे, आदित्य इंगोले, सागर बरडे, रवी बरडे या जीवरक्षकांचा यावेळी शाल, बुके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.