अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण करणाऱ्याला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola accused arrested for sexually abusing minor girl

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण करणाऱ्याला जन्मठेप

अकोला : शाळकरी मुलीचे अपहरणकरून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने (विशेष न्यायालय) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेत गेली असता तिचे अपहरण केले. ती घरी परत आली नाही म्हणून तिची शोधाशोध केली. अखेर तिच्या आजीने अकोट फैल पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या सहा महिन्यांनी आरोपी स्वत: पीडित मुलीसह पोलिसासमोर हजर झाला. या काळात ते पती-पत्नीसारखे गुजरातमध्ये राहत होते असे दोघांनी सांगितले.

मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तिला पळवून नेणे आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणे हा कायद्यानुसाार गुन्हा असल्याने पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आरोपी विरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६(२) (एन) व पॉक्सो कायदा कलम तीन, चार, पाच नुसार गुन्ह्याचे कलम वाढवले व त्याला अटक केली. पीएसआय छाया वाघ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल मंगला पांडे व किरण खोत यांनी आठ साक्षीदार तपासले.

अल्पवयीन मुलींचे वारंवार लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने कलम ३६३ मध्ये ७ वर्षे कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा, ३७६, ३७६(२) (एन) व पॉक्सो कायद्यानुसार दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. विविध कलमान्वये चार लाख रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावाली आहे. पोलिस कर्मचारी अरुण चव्हाण व एएसआय प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Akola Accused Arrested For Sexually Abusing Minor Girl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top