

Akola Gas Cylinder Blast
sakal
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रूक येथे गुरुवारी रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन झालेल्या अग्नीतांडवात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माय-लेक आणि शिक्षणासाठी आलेल्या आठ वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.