अकोला : चिपी लघु प्रकल्पाला २२ कोटींची प्रशासकीय मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Administrative approval 22 crore for Chipi small scale project MLA Amol Mitkari

अकोला : चिपी लघु प्रकल्पाला २२ कोटींची प्रशासकीय मान्यता

अकोला : तेल्हारा तालुक्यातील चिपी लघु प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चिपी लघु प्रकल्पाला २२ कोटी ८३ लाख २५ हजार ९०० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भूसंपादन व अन्य तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली. आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. त्यांनी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन सुद्धा घेतले. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आमदार मिटकरी यांनी केली.

स्थानिक भाजप नेत्यांवर टीका

बोरगाव येथे ३० खाटांचे रुग्णालय, खांबोरा ६० खेडी योजनेसाठी पाठपुरावा, ८४ खेडी योजनेला मिळवून दिलेली मंजुरी, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी सुरू असलेले प्रयत्न व शिवणी विमानतळ विस्तारिकरणासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. सदर सर्व कामे महाविकास आघाडी सरकारने केल्यानंतर सुद्धा भाजपचे स्थानिक नेते जनतेची दिशाभूल करून भाजपनेच विकास कामे केल्याची खोटी माहिती जनतेत पसरवत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.

कुटासा येथे लवकरच जैवविविधता प्रकल्प

आ. अमोल मिटकरी यांचे गाव असलेल्या कुटासा येथे जैवविविधता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच पर्यटनासाठी लोणार, शेगाव, वारी व नरनाळा टुरिज्म ट्रॅक तयार करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Akola Administrative Approval 22 Crore For Chipi Small Scale Project Mla Amol Mitkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top