अकोला : जिल्ह्यात आजपासून बियाणे विक्री महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Agriculture Department Seed sale Guardian Minister Bachchu Kadu

अकोला : जिल्ह्यात आजपासून बियाणे विक्री महोत्सव

अकोला : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले खात्रीशिर बियाणे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावे या हेतूने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील बियाणे विक्री महोत्सव कृषी विभागातर्फे बुधवार ते मंगळवार या काळात राबवला जात आहे. या महोत्सवाला बुधवारी औपचारिक सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा हा अभिनव महोत्सव होत आहे.

मृग नक्षत्रात पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करीत असतात. सात जूनपासून पेरणीसाठी पूरक वातावरण तयार व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे आगामी हंगाम डोळ्यासमोर ठेवून अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, तेल्हारा आणि अकोट अशा सात तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात हा बियाणे विक्री महोत्सव होत आहे. हंगामात शेतकऱ्यांना वाजवी दरात तसेच खात्रीचे बियाणे उपलब्ध झाले पाहिजे, या हेतूने हा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवासाठी बच्चू कडू यांनी सातत्याने आढावा घेत यंत्रणांना योग्य त्या सूचना केल्या होत्या. प्रत्येक कृषी सहायकामार्फत उपलब्ध बियाण्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर उपलब्ध बियाण्याची आकडेवारी निश्‍चित केल्या गेली.

जिल्ह्यात एकूण २८४ स्टॉल

अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात मिळून बियाणे महोत्सवासाठी ८४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी २८४ स्टॉल लावले जातील. यात अकोला बाजार समितीत ६०, बार्शीटाकळी ५५, मूर्तिजापूर ३०, पातूर १५, बाळापूर २४, तेल्हारा ५०, अकोट ५० अशा स्टॉलवरून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध राहील.

उगवण क्षमतेची चाचणी

शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील बियाणे विक्री कराण्यापूर्वी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी-तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे नोंदणी केली. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे बियाण्यांची ता. २४ व २५ मे दरम्यान ट्रेमध्ये उगवणशक्ती तपासणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. हा ट्रे विक्री महोत्सवामध्ये पाहणीसाठी ठेवण्यात येणार आहे.

घरचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी हा महोत्सव भरवला जात असून यात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. नोंदणी केलेल्यांनी बियाणे विक्रीसाठी आणावे तर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्याच शेतकरी भावाकडून बियाणे घ्यावे, यासाठी हा महोत्सव आहे. प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

-डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Web Title: Akola Agriculture Department Seed Sale Guardian Minister Bachchu Kadu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top