CM Fadnavis Promises Phased Development of Akola Airport Runway
sakal
-श्रीकांत राऊत
अकोला: अकोल्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या विमानतळ प्रकल्पात धावपट्टीचा दोन टप्प्यांत विकास केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात १८०० मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात २८०० मीटर धावपट्टी उभारली जाणार आहे. यामुळे अकोला थेट हवाई नकाशावर ठळकपणे येणार असून, शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.