Akola News : शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला गती; २१८ कोटींचा निधी; कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश जारी!

Akola Water Project : अकोलात अमृत २.० अंतर्गत शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २१८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ३१.९० किमी लांबीची मुख्य जलवाहिनी व जॅक वेल उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
Akola Amrit 2.0 Project Receives 218 Crore Funding

Akola Amrit 2.0 Project Receives 218 Crore Funding

Sakal

Updated on

श्रीकांत राऊत

अकोला : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल २१८ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर झाला आहे. महापालिकेकडून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्वाची असणार आहे. वाढती लोकसंख्या, विस्तारत्या वसाहती यामुळे नवीन प्रकल्पाची गरज निर्माण झाली होती. अमृत २.० अंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com