Akola : आयुर्वेदिक उटण्याची विक्री करून ‘आनंद’ला आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola news

Akola : आयुर्वेदिक उटण्याची विक्री करून ‘आनंद’ला आनंद

पातूर : तालुक्यातील चान्नी येथील जय बजरंग विद्यालयातील स्काऊट आणि गाईड विभागाच्या वतीने आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले उटणे पॅकिंग करून ‘खरी कमाई उपक्रमांतर्गत’ गावामध्ये त्याची विक्री केली आणि मिळालेल्या नफ्यातून इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारा आणि आई-वडिलांचे छत्र नसलेल्या आनंद राऊत व त्याच्या आजीला कपडे, फराळी पदार्थ, मिठाई देऊन दिवाळीत ‘आनंद’ला दिवाळी सणाचा ‘आनंद’ देऊन दिवाळी साजरी केली.

हेही वाचा: Akola : वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला ‘एसडीओं’चा चपराक

आत्रेय आयुर्वेद फार्माचे संचालक डॉ. स्वप्नील ढोकणे यांनी उटणे बनविण्यासाठी, तसेच अनिरुद्ध इंगळे यांनी पॅकिंगसाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी प्राचार्य संग्राम इंगळे यांच्या मार्गदर्शनात व स्काऊट आणि गाईड विभागप्रमुख वसंत ढोकणे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविला.

हेही वाचा: Akola : जुन्या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक

संस्थेचे संस्थापक सचिव गजानन इंगळे यांनी स्काऊट आणि गाईडच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी सर्वात जास्त उटणे पाकिटांची विक्री करणाऱ्या वैभव गाडगे व त्याच्या गरुड संघ सदस्यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्काऊटस आणि गाईडसने सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटून आनंदमय पद्धतीने दिवाळी साजरी केली.

हेही वाचा: Akola : रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यु

यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद, संजय खडके, संजय जायभाये, गजेंद्र भालेराव, संजय बोचरे, भावना ताडे, वैशाली इंगळे, एस.आर. गोपनारायण, एम.एस. शिरसाट, डी.जे. सातव, एस.के.नीलखन, अनिल इंगळे, दामोदर ताले, विजय भोपळे, हरिश्चंद्र येनकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रा.गाडगे, प्रा. शेलकर, प्रा.कालापाड, प्रा. राठोड, प्रा. श्रीमती गाडेकर यांनी स्काऊट आणि गाईड विभागाचे अभिनंदन केले.