Akola : अकोट शहरात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

Akola : अकोट शहरात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांना अटक

अकोट (जि. अकोला) : शहरातील हनुमान नगर परिसरात उद्धभवलेल्या दगडफेक प्रकरणात १४ तर, भंगार बाजार जाळल्या प्रकरणी सात आरोपींना अकोट शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहरात सद्या शांतता नांदत असून, पोलिस या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहचली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अकोट शहरातील हनुमान नगर परिसरात काही युवकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी शहरातील भंगार बाजाराला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात शांतता भंग पावली होती.

या घटनांमुळे प्रशासनाने शहरात संचारबंदी लावली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपींची धरपकड सुरू केली. आजपर्यंत दगडफेक करणाऱ्या अफजल शहा आयुब शहा (वय १९), अथर खान आमिर खान (वय २०), गुलाम इरफान उर्फ इनामदार गुलाम आरिफ (वय २७), जावेद शहा आबीद शहा (वय २५), नईमोद्दीन निझामोद्दीन (वय ३५), नसीमोद्दीन मोसिनोद्दीन जमादार (वय ३८), जावेद शहा उर्फ बबलू अहेमद शहा (वय २४), आझम शहा इब्राहिम शहा (वय १९), झाकीर शहा रशीद शहा (वय ४३), सय्यद हसन अली सय्यद निगाम अली (वय ३४), मो. आसिफ मो. आदिल पटेल (वय ४०), यासीन शहा रहेमान शहा (वय २८), मोहम्मद आझीम अब्दुल सत्तार (वय ३३) सर्व रा. अकोट, शेख अलिम शेख जियाउद्दीन (वय ४८) रा. पंचगव्हान ता.तेल्हारारा यांना अटक करण्यात आली.

२० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेले तीन आरोपी अलिम शेख जियाउद्दीन (वय ४८), सैय्यद हसन अली सय्यद निजामउदरी (वय ३४) मो.आरिफ पटेल (वय ४०) यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. भंगार बाजार जाळल्या प्रकरणी आरोपी सागर संजय लोंढे (वय २२), वैभव प्रकाश गोतमारे (वय २४), पंकज गुलाबराव पालेकर (वय २४), गोपाल मधुकर सावके (वय २२), प्रथमेश दिलीप सोळंके (वय १८), विशाल संजय लोंदे (वय १८), शुभम पुंडलिक देशमुख (वय २७) सर्व रा. अकोट या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. जाळपोळ प्रकरणातील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत ठोंबरे करीत आहेत.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

अकोट शहरातील जनजीवन पूर्वपदावर

स्थानिक हनुमान नगरातील परिसरात १३ नोव्हेंबर रोजी उद्धभवलेल्या दगडफेकीनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाकडून तातडीने पावले उचलत शहरात २४ तास संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या भंगार बाजाराला आग लागल्याने संवेदनशील अकोट शहराचा इतिहास पाहता स्थानिक प्रशासनाकडून पहिल्यांदा १७ नोव्हेंबर तर, दुसऱ्यांदा १९ नोव्हेंबरच्या सकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी तसेच, जमावबंदी लागू केली होती. मात्र, आता शहरात सर्वत्र शांतता असल्याने संचारबंदी काळात शिथिलता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात आता रात्री नऊ वाजतापासून सकाळी सहा वाजेपर्यंतच संचारबंदी असणार आहे. शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, बाजारपेठत ग्राहकांची खरेदी तसेच, बँक, शासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी होतांना दिसत आहे. ९ नोव्हेंबरपासून संचारबंदी सकाळी चार वाजतापासून शिथिलता मिळाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले.

loading image
go to top