अकोला : पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे

पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे
Akola Be careful monsoons Disaster Mechanisms redressal
Akola Be careful monsoons Disaster Mechanisms redressalsakal

अकोला : पावसाळ्यातील अतिवृष्टी, वादळ, विजा कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच आपत्ती दरम्यान व आपत्तीनंतर मदत व बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय, संपर्क राखावा व सतर्क राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात शुक्रवारी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलिस उपअधीक्षक (गृह) शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुंगारतुषार वारे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनाशी संबंधित सर्व यंत्रणा उपस्थित होत्या. बैठकीत जिल्ह्यातील मान्सून व त्याअनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचे सादरीकरण करण्यात आले.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा

सर्व स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावा. तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षावरुन घडलेल्या आपत्तीची वा स्थितीची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात यावी. तसेच गावनिहाय तालुकास्तरावरुन आपत्तीत मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, जेणे करुन नियोजन शक्य होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

अशी आहे तयारी

  • जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६९३.७ मि.मी इतके पर्जन्यमान अपेक्षित असते. जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे असे मिळून एकूण ३८ प्रकल्प आहेत.

  • अतिवृष्टी, नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होऊन मुख्य नद्यांमध्ये प्रवाह येणे, धरणे पूर्ण भरल्याने विसर्गामुळे पूर येणे यासारख्या कारणांमुळे पूरस्थिती निर्माण होत असते.

  • पूरस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा देणे, पूर बाधित गावांमध्ये मदत बचाव कार्याची सज्जता ठेवणे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे इत्यादी उपाययोजना कराव्या, असे सांगण्यात आले. अशावेळी वीज पुरवठा खंडीत होत असतो, तो शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी नियोजन करावे. वादळामुळे झाडे कोसळतात, त्यांना हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आले.

  • जिल्ह्यात एकूण ७७ गावे पूरबाधित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com