अकोला बनतेय गुन्हेगारीचे ‘हॉटस्पॉट’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

एक महिन्याच्या कालवधीत 13 खून ः शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढली गुन्हेगारी

अकोलाः लॉकडाउनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून, त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. 23 मे ते 8 जून या कालावधीत 13 खून झाले आहेत. एकूणच कोरोनासोबत अकोला आता गुन्हेगारीचेही हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अनेक गुन्हेगार अंडरग्राउंड होते. त्यामुळे या काळात गुन्ह्याचे प्रमाणही कमी होते. मात्र, लॉकडाउनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून, त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी संयम ठेवला होता. आता संचारबंदीला थांबा मिळताच गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. कधी शांत, संयमी तर कधी आदर्शवत कृतीतून राज्यभर नावलौकिक मिळविणाऱ्या अकोला जिल्हा टाळेबंदीनंतर विघ्नसंतोषी असल्यासारखा वागत असल्याचे दिसून येत आहे. कारण, टाळेबंदी शिथील होताच अकोला जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याइतपत गुन्हेगार जाऊन पोहचले आहेत. टाळेबंदी शिथील होताच जिल्ह्यात लागोपाठ खुनाच्या घटना घडत असल्याने अकोल्याच्या सहनशक्तीला झाले तरी काय? असा प्रश्‍न या निमित्ताने समोर येत आहे.

अगदी क्षुल्लक कारणांनी घडले मृत्यूकांड
एमआयडीसीतील एका निर्माणाधीन कंपनीमध्ये काम करणार्‍या दोन मजुरांमध्ये वाद होऊन एक आणि दुसऱ्याचा खून केल्याची घटना घडली होती घटना घडते ना घडते तोच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खरप येते खरकटे पाणी टाकले या कारणावरून बापल एकाची हत्या करण्यात आली होती तर बाळापूर तालुक्यातील मांजरी येथे दारू पिऊन झालेल्या वादात एका जनाचा खून करण्यात आला होता. अशातच पुन्हा बोरगाव मंजू येथे एका जणांचा खून करण्यात आला आहे. या घटना ताज्या असतानाच बोरगावमंजू येथे एका मुलाने चक्का आईला दगडाने ठेचून खून केला तर अकोट तालुक्यात इस्टेटीच्या वादातून एकाच खून करण्यात आला. या घटना अगदी मन हेलावून सोडणाऱ्या आहेत. असे असताचा अनलॉक सुरू होताच अकोटफैल आणि जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गंत एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

टाळेबंदीनंतर गुन्हेगारीचे कारणंही बदलली
अकोल्यात खून, अत्याचार, चोरी, घरफोडी, विनयभंग, पाठलाग करून लुटमार करणे आदी गुन्हे अकोल्यात घडत होती. खून आणि खुनाच्या प्रयत्न हे गुन्हे घडण्या मागची कारणे ही पैसा, प्रॉपर्टीचा वाद, अनैतिक संबंध यामुळे घडत असत. मात्र, टाळेबंदीनंतर घडत असलेल्या गुन्ह्यांच्या कारणाचा वेद घेतला असता अगदी पाणी फेकले म्हणून, दारू पाजली नाही म्हणून खून करण्यात आल्याची कारणे पुढे आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी वाढली
अकोल्यात जेवढ्या घटना घडल्या त्या घटनांचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. असे जरी असले तरी एकीकडे पोलिस कर्मचारी कोरोनाच्या बंदोबस्तात अडकल्याने गुन्हेगाराना शोधून काढण्याची जबाबदार स्थानिक गुन्हे शाखेवर येऊन पडली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola becomes hotspot for crime