esakal | कोरोनाच्या सावटातही या पक्षाने जाहीर केली जम्बो जिल्हा कार्यकारिणी 
sakal

बोलून बातमी शोधा

eiection

कोरोना विषाणूच्या संकटामुळे रखडलेली भाजपच्या जिल्हा कार्याकारिणीतील नियुक्ता गुरुवारी जाहीर करण्यात आल्यात. अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा कार्यकारिणीतील 29 पदाधिकाऱ्यांसह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केलीत.

कोरोनाच्या सावटातही या पक्षाने जाहीर केली जम्बो जिल्हा कार्यकारिणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या संकटामुळे रखडलेली भाजपच्या जिल्हा कार्याकारिणीतील नियुक्ता गुरुवारी जाहीर करण्यात आल्यात. अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा कार्यकारिणीतील 29 पदाधिकाऱ्यांसह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केलीत.


या कार्यकारिणीत 11 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस व 11 सचिवांचा समावेश आहे. याशिवाय 114 कायम निमंत्रित व कार्यकारिणी सदस्यांसह 30 आघाड्या व संयोजकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याकारिणीत उपाध्यक्ष म्हणून शिवाजीराव देश्मुख, मनोहरराव राहणे, शंकरराव वाकोडे, प्रभाकरराव मानकर, किशोरसेठ गुजराथी, हिरासिंग राठोड, अनिल पोहोणे, दत्तात्रय धनोकार, विजयसिंह गहिलोट, रामदास तायडे, रावसाहेब कांबे यांचा समावेश आहे.

संघटन सरचिटणीस म्हणून माधव शामराव मानकर तर केशव ताथोड व रमेश अप्पा खोबरे यांचेकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. सचिवपदावर विलास पोटे, प्रेमानंद श्रीरामे, अनिल गावंडे, राजेश रावणकर, प्रकाश श्रीमाली या माजी तालुका अध्यक्षांना बढती दिली. ओबीसी सेलचे मंचीतराव पोहरे, भाजयुमोचे डॉ. संजय शर्मा, चंद्रकांत अंधारे यांच्या कार्याची सुद्धा दाखल पक्षाने घेऊन त्यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. राधाताई तिवारी, विजयसिंग सोळंके व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटकर यांनाही सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून वसंत बाछुका, कार्यालय मंत्री म्हणून अरुण उर्फ नाना कुलकर्णी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून गिरीष जोशी कायम आहेत. याशिवाय विविध सेलेच्या व आघाडीच्या प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली.


हे आहेत विधानसभा प्रमुख
अकोला पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून अभिमन्यू नळकांडे, मूर्तुजापूर गोवर्धन काकड, अकोट सुहास भांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायम निमंत्रितांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात, उपेंद्र कोठेकर, श्रावण इंगळे आदींचा समावेश आहे.