esakal | ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana Marathi News- - Kamalabai Bhutada at the age of 70 was registered in the India Book of Records

धार्मिक कार्याची आवड, अध्यात्माची ओढ आणि वय झालं तरीही जीवनात काहीतरी करून जाण्याची जिद्द यातून चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्याची किमया साधली ति 70 वर्षीय वृद्धा श्रीमती कमलाबाई भुतडा यांनी. 

ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : धार्मिक कार्याची आवड, अध्यात्माची ओढ आणि वय झालं तरीही जीवनात काहीतरी करून जाण्याची जिद्द यातून चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्याची किमया साधली ति 70 वर्षीय वृद्धा श्रीमती कमलाबाई भुतडा यांनी. 


मूळ चिखलीच्या रहिवासी श्रीमती कमलाबाई भुतडा या देऊळगाव राजा येथे राजेश भुतडा या मुलासोबत राहतात. श्री बालाजी महाराजांच्या निस्सीम भक्त असलेल्या कमलाबाई यांची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद करण्यात आली असून त्यांनी ’ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र 2 लाख 20 हजार वेळा लिहिला.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!

2014 पासून त्यांनी हा मंत्र लिहावयास सुरवात केली. यासाठी तब्बल 18 रजिस्टर लागले. सुरवातीपासूनच अध्यात्माशी स्वतःला जोडून धार्मिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सध्यास्थितीत त्यांचे वय 70 वर्ष असून 21 जानेवारी 2014 ला त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहावयास सुरवात केली.

ते कार्य 20 जानेवारी 2020 रोजी त्यांनी पूर्ण केले. याबरोबरच त्यांनी विठ्ठल नामाचा लेखणी जपही 2 लाख 20 हजार वेळा लिहिले आहे. गत सहा वर्षापासून त्या सातत्याने दररोज किमान चार ते पाच तास मंत्राचे लिखाण करतात.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांच्या या अविरत कार्याचा सुरू असलेला वसा बघून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या  उदात्त हेतूने त्यांचे कार्य इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेकडे पाठविण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये त्यांची नोंद करण्यात आली असून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानपत्र मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण

अभिनंदनाचा वर्षाव
बुलडाणा जिल्ह्यातून प्रथमच एका 70 वर्षीय महिलेने अध्यात्माच्या मार्गाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविल्या बद्दल श्रीमती कमलाबाई भुतडा, त्यांचा मुलगा राजेश भुतडा व सून वनिता भुतडा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. धार्मिक कार्याची आवड अध्यात्माची ओढ आणि वय झाले असले तरी ही जीवनात काहीतरी करण्याची जिद्द यातून कमलाबाई यांनी आपल्या जीवनातील उच्च शिखर गाठले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image