
एकीकडे शनिवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची तयारी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटन्याचे नाव नाही. बुधवारी नव्याने ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
अकोला : एकीकडे शनिवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची तयारी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटन्याचे नाव नाही. बुधवारी नव्याने ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
जिल्ह्यातील २९७ रुग्णांच्या तपासणीचे अहवाल बुधवारी प्राप्त झालेत. त्यातील ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय आठ रुग्ण हे रॅपिड ॲँटिजनमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व अहवाल सकाळी प्राप्त झाले होते. त्यात १५ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे.
हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात
त्यातील आदर्श कॉलनी येथील चार, मित्रानगर व कमल टॉवर जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, मोठी उमरी, जठारपेठ व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मलकापूर, जुने शहर, जांवसु ता. बार्शीटाकळी, धमानधरी ता. बार्शीटाकळी, गोरक्षण रोड, बेसेन रिंगरोड, पाथर्डी ता. तेल्हारा, शंकर रोड, साने गुरुजी नगर, कैलास नगर, तरोडा ता. अकोट, जवाहर नगर, न्यू महसूल कॉलनी व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
हेही वाचा -बर्ड फ्ल्यूचा धोका; ३५० पक्षांचे नमुने निगेटिव्ह
एकाचा मृत्यू
कोरोना संसर्ग झालेल्या एका एकाचा बुधवारी मृत्यू झाला. हा रुग्ण गुरुदत्तनगर, डाबकी रोड येथील ८३ वर्षीय पुरुष होता. उपचार दरम्यान त्यांचा मुत्यू झाला. त्यांना ता.५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३८ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २५ अशा एकूण ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा -आघाडी सरकारला जनतेच्या आरोग्याची पर्व नाही - भाजपचा आरोप
रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात झालेल्या ६४ चाचण्यांपैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तेल्हारा येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
(संपादन - विवेक मेतकर)