खासदारांच्या गावात स्वाभिमानीच्या शिट्ट्यांनी बसल्या शिवसेनेच्या कानठळ्या

Akola Buldana Marathi News- Swabhimani Shetkari Sanghatanas whistle in MP Prataprao Jadhavs village Gram Panchayat election
Akola Buldana Marathi News- Swabhimani Shetkari Sanghatanas whistle in MP Prataprao Jadhavs village Gram Panchayat election

बुलडाणा : निवडणुका आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्नात असतो. त्यातूनच काही अफलातून प्रकार घडतात.  

बुलडाणा जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे जन्मगाव असलेल्या मादणी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढती होत आहेत.

या गावात चार पॅनेल असून स्वाभिमानीचे उमेदवार नीतिन अग्रवाल हे एकटेच उघडपणे प्रचार करत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी असून गावात आता त्यांच्या शिट्टीचा आवाज घुमत आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांचे मादनी हे गांव बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यात आहे. तेथे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. गावात चार पॅनेल असली तरीही केवळ एकाच पॅनेलचा प्रचार सुरु असून उमेदवारही घराबाहेर निघत नाहीत, असे चित्र आहे. ग्रामस्थ सुद्धा प्रचारात दिसत नाहीत.

या निवडणुकीत आपलंगांव आपला विकास पॅनल, जनविकास पॅनल, ग्रामविकास पॅनल आणि ग्रामसेवा एकता पॅनल अशा चार पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीत नऊ सदस्य पाठवायचे आहेत. या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

विद्यमान खासदारांच्या विरोधात कोण जाईल, अशी भीती उमेदवारांमध्ये असल्याची चर्चा आहे. या साऱ्या धामधुमीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नीतिन अग्रवाल हे फक्त उघडपणे प्रचार करत आहेत. त्यांनी आपले निवडणूक चिन्ह असलेल्या शिट्ट्या गावातल्या मुलांना वाटल्या आहेत.

ही मुळे शिट्टया वाजवत गावात फिरत असल्याने गावात फक्त स्वाभीमानीची शिट्टी वाजली, अशी गमतीदार चर्चा सुरु असताना दिसते. या शिट्ट्या सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता चार पॅनेलमध्ये बाजी कोण मारणार, खासदारांच्या विरोधात कोण जाणार आणि मुख्य म्हणजे स्वाभीमानीची शिट्टी वाजणार की बंद पडणार, यासाठी १८ तारखेपर्यंत थांबावे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com