
शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावागावांमध्ये आता आपल्या ग्रामपंचायतीवर कुणाला प्रशासक नेमणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. बिगर राजकीय व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमावे व यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित व्यक्तीची नेमणूक करतील अशी तरतूद होती. मात्र या संदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नसल्याचे कळते.
जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून ‘अधिकारी राज’ मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपत आहे. यापैकी २२८ ग्रामपंचायतींची मुदत आज संपत असल्याने उद्यापासून २२८ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांचे राज्य असणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमधील अधिकारी प्रशासन म्हणून ग्रामपंचायतीवर जाणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा या निर्णयानुसार ३० ऑगस्टला मुदत संपणाऱ्या २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून प्रशासकीय अधिकारी कारभार पाहणार आहेत. बुलडाणा तालुक्यातील ५१, देऊळगाव राजा २६, मलकापूर ३३, खामगाव ७१, जळगाव जामोद २४, संग्रामपूर २७, लोणार १७, चिखली ६०, शेगाव ३४, सिंदखेड राजा ४३, नांदुरा ४८, मोताळा ५२, व मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. जिल्ह्यातील रिक्त ग्रामपंचायतीची संख्या व जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्यामध्ये तफावत होत असल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाखा अभियंता यांच्यावर देखील ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्यामुळे एका अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे.
|
|||
Web Title: Akola Buldana News 228 Gram Panchayat Administrator Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..