esakal | वेगळा प्रयोग: कर्जमाफीसाठी थेट कारागृहात जाऊन केले आधार प्रमाणीकरण 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News Aadhaar Certification District Co-operative Bank

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर लागलीच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होते.

वेगळा प्रयोग: कर्जमाफीसाठी थेट कारागृहात जाऊन केले आधार प्रमाणीकरण 

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा  ः महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर लागलीच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होते.

बुलडाणा कारागृहात जावून थेट कारागृहातूनच सभासदाचे बोटाचे ठसे घेत आधार प्रमाणीकरण करण्यात आले. थेट कारागृहातच बंदीजन असले तरी कर्जमाफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करीत जिल्हा बँकेने वेगळा प्रयत्न केला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न दादगांव (ता. नांदुरा) ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कर्जदार गोपाळ दीपा तेलंग (रा. दादगांव) कर्जमाफीस योजनेस पात्र होते. योजनेच्या निकषानुसार सभासदाला संबंधीत बँक शाखेमध्ये स्वत: बोटाचे ठसे देऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक होते.

त्यानंतरच सभासदास कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. मात्र, सभासद बुलडाणा कारागृहात शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या परवानगीने ६ ऑगस्ट रोजी बुलडाणा कारागृहात जावून थेट कारागृहातूनच सभासदाचे बोटाचे ठसे घेत आधार प्रमाणीकरण करण्यात आले.

थेट कारागृहातच बंदीजन असले तरी कर्जमाफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करीत जिल्हा बँकेने वेगळा प्रयत्न केला आहे. तसेच शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी बँकेकडून करण्यात आली आहे.

याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक महेश कृपलानी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अ. वा. खरात, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. चव्हाण, व्यवस्थापक एम. एम ठाकरे, आयटी अधिकारी डी. एस गायकवाड, सहा. मुख्य अधिकारी जी. एस रहाटे आदी उपस्थित होते. सभासदाचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा कारागृह अधिक्षक श्री. गुल्हाने, तुरूंग अधिकारी श्री. हिवाळे, दिलीप काळे, श्रीमती अर्चना खंदारे आदींचे सहकार्य लाभले.
(संपादन - विवेक मेतकर)