28 वर्षीय महिलेला तलाठ्याने शेतीच्या नोंदीसाठी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील 28 वर्षीय महिलेकडून शेतीची नोंद करण्याची तलाठ्याने तीनशे रुपये लाच घेतल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कार्यवाही करत अटक केल्याची घटना बिबी येथील बसस्थानक परिसरात आज (ता.22) घडली.
 

लोणार (जि.बुलडाणा) : आपण सतत भ्रष्टाचार हा शब्द ऐकत आलेलो आहोत. आपल्या देशात आणि राज्यात हा भ्रष्टाचार कसा काय निर्माण झाला असेल? ही समस्या सामाजिक व्यवस्थेचे स्वरूप आहे की व्यक्तिगत कारणे देखील यासाठी जबाबदार आहेत याचा सविस्तर विचार केला गेला पाहिजे. समाजमन आणि व्यक्ती कसा काय भ्रष्टाचारापासून दूर राहू शकतो याचेदेखील सखोल चिंतन करावयाची गरज निर्माण झालेली आहे.

भ्रष्टाचार आपल्याला सतत न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे यामधून कळून येतो. त्याची झळ सरळ व्यक्तिगत स्तरावर पोहचत नसल्याने भ्रष्टाचार ही समस्या आपल्याला मोठी वाटत नाही. परंतु कधीकधी स्वतःला एका व्यवस्थेत किंवा संस्थेत लाच द्यायला लागल्यावर हा भ्रष्टाचार किती भयंकर आणि मोठा असू शकतो याची जाणीव मात्र होते. ज्या सरकारी आणि सामाजिक व्यवस्था आज निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार सहज आढळून येतो

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

अशीच एक घटना लोणार तालुक्यात उघडकीस आली. तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील 28 वर्षीय महिलेकडून शेतीची नोंद करण्याची तलाठ्याने तीनशे रुपये लाच घेतल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कार्यवाही करत अटक केल्याची घटना बिबी येथील बसस्थानक परिसरात आज (ता.22) घडली.

महिला शेतकर्‍याने विहिरीची नोंद सातबार्‍यावर करण्यासाठी तलाठ्याने पाचशे रुपयांची लाच मागितली होती. ही माहिती तक्रारदार महिलेने आज (ता.22) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांना दिली. लगेच पथक बिबीकडे रवाना झाले होते.

हेही वाचा -   शहरातील फक्त पाच पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवेसाठी राहणार सुरू

बिबी येथील बस स्टॅण्ड परिसरातील ताज फोटो स्टुडीओसमोर रस्त्यावर तलाठ्याने तडजोडीअंती तीनशे रुपयांची लाच स्वीकारली. अगोदरच सापळा रचलेल्या एसीबीच्या अधिकार्‍यांनी तलाठ्याला तीनशे रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा - शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

ही कारवाई विशाल गायकवाड (पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती) यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाण्याचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ, पो.ना. श्री. साखरे, पो. ना. बैरागी, पोलिस शिपाई विनोद लोखंडे, महिला पोलिस शिपाई स्वाती वाणी, चालक पोलिस शिपाई श्री. रगड यांनी पार पाडली.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Arrested in Lonar for taking bribe of Rs 300 from a woman